सरकारी योजना - प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 अंतर्गत माननीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या शुभहस्ते पोर्टल मधील नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी एकत्रित लाभ वितरित होणार आहे.
Sarkari Yojna:- PMMVY 2.0
केंद्र शासनाच्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचना नुसार प्रधान मंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभार्थ्यांना खालील प्रमाणे लाभ दिला जाणार आहे.
१) पहिल्या अपत्यासाठी रु. ५०००/- ची रक्कम दोन हप्त्यामध्ये खालील प्रमाणे-
PMMVY अटी आणि हप्ते | ||
हप्ता | अट | रक्कम |
पहिला हप्ता | मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थांमध्ये गरोदरपणाची नोंदणी आणि किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करून घेणे आवश्यक आहे. | रु. ३०००/- |
दुसरा हप्ता | १) जन्म नोंदणी प्रमाणपत्र २) मुलाला BCG, OPV, DPT, IPV, Hep B च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण) / करणे आवश्यक आहे. | रु. २०००/- |
२) दुसरे अपत्य मुलगी असल्यास रू ६०००/- चा लाभ बाळाच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात दिला जाईल.
३) जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या गरोदरपणात एकापेक्षा जास्त जुळे- तीळे चार अपत्य झाले असतील, त्यापैकी एक किंवा अधिक मुली असतील तर तिला PMMVY 2.0 नियमानुसार दुसऱ्या मुलीचा लाभ मिळेल.
४) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भधारणे दरम्यान कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका किंवा कोणत्याही शासकीय संस्थेत नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात (DBT) द्वारे जमा केला जाईल.
pmmvy-cas.nic.in login
५) महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवरून लाभार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
६) या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड enrollment ID अनिवार्य करण्यात आले आहे.
PMMVY 2.0 Scheme- योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत) pmmvy form
१) ज्या महिलांची निवड कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष रुपये आठ लाख पेक्षा कमी आहे.
२) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला,
३) ज्या महिला अंशता 40 टक्के किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन)
४) बीपीएल शिधाधारक पत्रिका महिला
५) आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी
६) ई -श्रम कार्डधारण करणाऱ्या महिला
७) किसान सन्माननीधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
८) मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला.
९) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा