CMRF Maharashtra
मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. त्याकरिता मंत्रालयातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८६५०५६७५६७ हा Mobile No वर Miss Call चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी करिता आता सहज, सोप्या आणि कमी वेळात निधी मिळेल.
पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य दिले जाते. आर्थिक दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते.
अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारा त्रास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, लक्षात घेऊन लाभार्थ्यांना थेट Miss Call अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराने ८६५०५६७५६७ या मोबाईल क्रमांकावर Miss Call केल्यानंतर अर्जाची Link SMS द्वारे प्राप्त होईल. त्या Link वर Click केल्यावर Download होणाऱ्या अर्जाची Print काढून तो भरावा लागेल. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष वा Scan करून PDF मध्ये cmrf.maharashtra.gov.in या Email Id वर Upload करण्याचे कराव लागेल.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आवश्यक कागदपत्रांची यादी
1) वैद्यकिय खर्च अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
2) तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न 1.60लाख पेक्षा कमी.)
3) रुग्ण आधारकार्ड
4) रेशनकार्ड
5) आजार रिपोर्ट
6) दवाखान्याची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
7) अपघात झाला असल्यास, FIR किंवा MLC आवश्यक.
8) अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा