नात्यात लग्न / Consanguineous Marriage करताय तर आताच सावध व्हा. अशा लग्नामुळे Hereditary Disease/ आनुवंशिक आजाराचे प्रमाण दिवसन दिवस वाढत आहे.
- Effects of Consanguineous Marriage/ नात्यामध्ये लग्न केल्यामुळे खालील प्रमाणे आजाराचा धोका उध्दभवू शकतो.
१) नात्यात लग्न केल्याने प्रजननशक्ती (Fertility) वर परिणाम होऊ शकतो.
२) गर्भपाताचे प्रमाण (Abortion Rate) वाढू शकते.
३) ‘स्टील बर्थ’ (Still Birth ) म्हणजे गर्भात बाळाचा मृत्यू होऊ शकतो.
4) इतर मुलांच्या तुलनेत मुलाचा बुद्ध्यांक (IQ) कमी होऊ शकतो.
परंतु ज्यांचे नात्यात लग्न झालेले आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. Genetic Counselor किंवा आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना (Gynecologists) या विषयी माहिती द्यावी. आनुवंशिक आजार (Hereditary disease) टाळण्यासाठी काळजी घ्यावी.
- Consanguineous Marriage/ नात्यामध्ये लग्न केल्यामुळे ‘थॅलेसेमिया (Thalassemia)’ चाही धोका उध्दभवण्याचे प्रमाण जास्त आहे.
‘थॅलेसेमिया मायनर (Thalassemia Minor)’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्ये अत्यंत घातक थॅलेसेमिया पीडित (Sufferers of thalassemia major) होऊ शकते. ज्यामुळे जीवहानी होण्याची शक्यता असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री-पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना ‘थॅलेसेमिया मायनर’ची रक्त चाचणी (Blood test for thalassemia minor) करणे अत्यंत आवश्यक आहे.
‘थॅलेसेमिया मेजर (Thalassemia major)’ या रोगाने पीडित मुले शरीरात रक्त कमी असल्या कारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्त पुरवठा (Blood Supply) करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार खूप कठीण आणि खर्चिक आहे.
- नात्यात लग्न (Marriage in relationship) टाळलेलेच बरे -
जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे (hereditary disease) प्रमाण जास्त असते. यात रक्तविकारांसह मेंदू व मांसपेशी संदर्भातील आजार होण्याचा धोका असतो. विशेषत: सिकलसेल (Sickle cell) व थॅलेसेमिया (Thalassemia) आजाराचा धोका वाढतो. यामुळे शक्यतो जवळच्या नात्यात लग्न टाळलेच पाहिजे. लग्न झाले असले तर अपत्य होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Consanguineous Marriage विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा