ऑनलाइन EPF पैसे काढण्याची प्रक्रिया 2023 -आता तुम्ही घरी बसून EPF मधून पैसे काढू शकतात.
कोणत्याही कंपनीत काम करणारी कर्मचारी जेव्हा रिटायर किंवा दोन महिने सतत बेमुदत बेरोजगार राहतात. तेव्हा epf withdrawal पैसे काढू शकता. याशिवाय वैद्यकीय इमरजेंसी, विवाह, होम लोन ची EMI इत्यादी कारणासाठी EPF आपण शकतो. पैसे काढणे Online & Offline दोन्ही पद्धतीने काढणे शक्य आहे.
जर आपण Online पद्धतीने EPF काढायचे असेल तर खालील Step नुसार काढू शकतो.
STEP 1: EPFO च्या सदस्याला E-Seva Potal unifiedportal-mem.epfindia.gov.in लॉगिन करणे आवश्यक आहे.
STEP 2: यापुढे Manage वर क्लिक करा आणि KYC निवडून आपले KYC तपासून घ्या.
STEP 3: यापुढे 'Online Services' टॅबवर जा 'Claim (Form-31, 19, 10C & 10D)' वर क्लिक करा.
STEP 4: आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावरील सदस्य UAN लिंक केलेला बँक खाते क्रमांक टाकणे आवश्यक आहे. यापुढे 'Verify' वर क्लिक करावे लागेल.
STEP 5: बँक खाते पडताळणीसाठी पुढे जाण्यापूर्वी 'Certificate of Undertaking' मंजूर करणे आवश्यक आहे.
STEP 6: आता 'Proceed For Online Claim' वर क्लिक करावे लागेल.
STEP 7: आता दिलेल्या यादीतून सदस्याला PF खात्यातून पैसे काढण्याचे कारण निवडावे लागेल. येथे तुम्हाला तेच पर्याय दिसतील ज्यासाठी तुम्ही पात्र आहात.
STEP 8: सदस्याला आता त्याचा पूर्ण पत्ता टाकावा लागेल. तसेच सदस्याला चेकची स्कॅन केलेली प्रत किंवा बँक पासबुक पोर्टलवर अपलोड करावे लागेल.
STEP 9: आता नियम आणि अटी निवडत आहे 'Get Aadhaar OTP' वर क्लिक करावे लागेल.
STEP 10: आता आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते एंटर करा आणि Claim वर क्लिक करा. काही दिवसातच तुमची PF रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर होईल.
या कागदपत्रांची आवश्यकता असेल
- Composite Claim Form
- Two revenue stamps
- Bank account statement
- Identification card
- Address Certificate
- canceled blank check

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा