रोगांचे (Deasese) वर्गीकरण हे आठ प्रकारांमध्ये केले जाते. ते खालील प्रमाणे आहेत
१) संसर्गजन्य रोग- इन्फ्लुएंझा, क्षय, नायटा, अमांश घटसर्प, पोलिओ.
२) असंसर्गजन्य रोग- मधुमेह (डायबिटीस), कर्करोग.
३) विषाणू पासून होणारे रोग - देवी, इन्फ्लुएंझा पोलिओ, कांजण्या.
४) जिवाणू पासून होणारे रोग - कुष्ठरोग, कालरा (पटकी), न्यू, क्षय (टी.बी). (skin deasese)
५) दूषित पाण्यापासून पसरणारे रोग- कॉलरा, विषमज्वर, अतिसार, कावीळ, जंत इत्यादी.
६) हवेतून पसरणारे रोग - सर्दी, इनफ्लुएंझा, घटसर्प, क्षय.
७) कीटकांमार्फत पसरणारे रोग- अतिसार, अमांश, पटकी, मलेरिया, हत्तीरोग, नारू, प्लेग.
८) कवकपासून पासून होणारे रोग - गजकर्ण, चिखल्या.
जीवनसत्वे (vitamins) व त्यांचे शास्त्रीय नाव- vitamins chart, types of vitamins
1) Vit A - रेटीनाल
२) Vit B - (B - Complex)
3) B-1 - थायमिन
4) B-2 - रायबोप्लेविन
5) B-3 - पेंटोथेनिक आम्ल
6) B-5 - निआसिन
7) B-6 - पेंटोथेनिक आम्ल
8) B-7 - बायोटीन
9) B-9 - फॉलिक ऍसिड
10) B-12 - सायनोक्लोबाल्मिन
11) C - अस्कॅबिक ऍसिड
12) D - कॅल्शिफेराल
13) E - टोकोफेराल
14) K - फाईलोक्वीनोन
महत्त्वाच्या रोगासबंधी माहितीसाठी OPEN करा
जीवनसत्वांच्या अतिसेवनामुळे अधिक यामुळे जडणारे रोग (Deasese) -
1) अ जीवनसत्वाचे अति सेवन- डोकेदुखी, वांत्या, शिराशी येणे, भूक मंदावणे, सांधेदुखी, यकृतांच्या आकारात वाढ, केस गळती, ओठ फाटणे. तसेच गांजरांच्या अतिसेवणामुळे त्वचेत पिवळसर वर्णक तयार होते.
२) ड जीवनसत्वाचे अधिक्य- अतिकॅल्शियमता (रक्तातील कॅल्शियम वाढणे), अतीफास्फेटमयता, डायरिया (तीव्र अतिसार), वांत्या, शिसारी ही लक्षणे आढळतात. तसेच अरिथमिया या स्थितीत हृदयाचे व नाडीचे ठोके अनियमित पडतात.
पाण्यात द्रावणीय असणाऱ्या ब आणि क या जीवनसत्वांच्या बाबतीत जीवनसत्व अधिक्य आढळत नाही कारण मूत्रविसर्जनाद्वारे त्यांचे जादा प्रमाण शरीरा बाहेर टाकले जाते.
आहारातील पोषण द्रव्याच्या अतिसेवनामुळे (अधिक्यामुळे) होणारे रोग (Deasese)-
अतिपोषणामुळे लठ्ठपणा, मधुमेह, परीहृद रोग, अतिताण यासारखे रोग होतात
१) अतिलठ्ठपणा (obesity) - स्निग्धे व कर्बोदके यांचे अति सेवन केल्याने होतो. हा विकार शरीरातील मेदपेशींची संख्या वाढल्याने तसेच मेदपेशींचा आकार वाढल्याने उद्भवतो. अति लठ्ठपणा देह -वस्तुमान निर्देशांकांच्या साहाय्याने दर्शविला जातो.
२) मधुमेह (Diabetes-mellitus) - स्नीग्ध व कर्बोदके (शर्करा) अतिसेवनामुळे होतो. इन्सुलिन च्या कमतरतेमुळे होतो. इन्सुलिनची निर्मिती व चयापचय या प्रक्रिया सदोष असल्यास होतो. बहुमूत्रता (प्यालियुरिया), अतितहान (पॅलीडीप्सिया), वाढती भूक पण वजनात घट (पालिफेजिया), अति थकवा अंधुक दृष्टी ही मधुमेहाची सामान्य लक्षणे आहेत.
इन्फ्लेशन, सिस्टीक फायब्रासिस (स्वादुपिंडाची विकृती), बीटा पेशींचा हऱ्यास यामुळे इन्सुलिनची कमतरता असते व मधुमेह होतो.
आहारातील प्रमुख मूलद्रव्य व त्यांच्या अभावी होणारे रोग (Deasese)-
१) लोह- पांडू रोग
२) कॅल्शियम व फॉस्फरस - मुडदुस, अस्तीमृदुता
३) सोडियम - हायपोनाट्रेमीया
४) मॅग्नेशियम - यकृताचा सिरासिस, गरोदरपणातील टॅक्सेमिया
५) आयोडीन- गलगंड (गायटर) (अवटू ग्रंथीचा विकार)
६) मालिब्लेडम - तोंडाचा व अन्ननलिकेचा कर्करोग
७) तांबे (Cu) - न्यूट्रोपेनिया: रक्तातील न्यूट्रफिल पेशींची संख्या घटते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा