Abha Health Card

खालील माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा घरबसल्या ABHA Card बनावू किव्हा अगोदरच बनविला असेल तर Mobile No किव्हा ABHA No द्यारे Download करू शकता. 

Abha Health Card

आभा (ABHA) म्हणजेच Ayushman Bharat Health Account Number (आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर). हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल. यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झालातो कधी व कोणत्या दवाखान्यात झालाकोणत्या टेस्ट करण्यात आल्याकोणती औषधं देण्यात आलीरुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेततो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलायही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल. 

ABHA Card हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.

या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पणत्यासाठी तुमची संमती अनिवार्य असेल.

याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे Health Card म्हणजेच तुमचं आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलीटही करू शकाल. या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठीगोळ्यांची कागदं सोबत न्यायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील. 

 आभा हेल्थ कार्ड कसं बनवायचं? (abha id creation)

dataentryhealth.in वर जाऊन CREAT YOUR ABHA Card Download वर क्लिक करा. Create Abha Card

यानंतर 'आयुष्मान भारत डिजिटल मिशनयोजनेची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

Abha Health Card

इथल्या Create ABHA Number या रकान्यात क्लिक करायचं आहे.

इथं तुम्ही एकतर Adhar Card किंवा मग ड्रायव्हिंग लायसनचा वापर करून ABHA Health Card काढू शकता.

Abha Health Card

Adhar card वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचं आधार मोबाईल क्रमांकाशी लिकं असणं गरजेचं आहे. 

 

Abha Health Card

सुरुवातीला Adhar Number टाकायचा आहे. तिथं दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे. सहमत असाल तर रकान्यात टिक करायचं आहे. खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि मग next वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. तो टाकून Next वर क्लिक करायचं आहे.

पुढे स्क्रीनवर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचं नावलिंगफोटोजन्मतारिखपत्ता तिथं दिसून येईल. Aadhaar Authentication Successful झाल्याचीही सूचना तिथं असेल. त्यानंतर next वर क्लिक करायचं आहे.

Abha Health Card




त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथं तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मग next वर क्लिक करायचं आहे.

तुम्ही तुमचा ई-मेल अड्रेसही आभा क्रमांकाशी जोडू शकता. जोडायचा नसेल तर इथल्या skip for now या पर्यायावर क्लिक करा.

आता स्क्रीनर तुमचा आभा नंबर तयार झाल्याची सूचना स्क्रीनवर दिसेल. त्याखाली आभा नंबर नमूद केलेला असेल. आता इथल्या Link ABHA Address या रकान्यात क्लिक करायचं आहे.

तुम्ही याआधी आभा अड्रेस तयार केलाय का, असा प्रश्न तिथं विचारला जाईल. तिथल्या No वर टिक करून sign up for ABHA Address रकान्यात क्लिक करायचं आहे.

इथं सुरूवातीला तुम्हाला तुमचे Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचून तुम्हाला ABHA Address तयार करायचा आहे. खालच्या रकान्यात तुम्ही तुमचं नावजन्मतारीख यापैकी जे लक्षात राहण्यासाठी सोपं आहे ते टाकून आभा address तयार करू शकता. हे टाकून झालं की create and link या रकान्यात क्लिक करायचं आहे.

तुमचा Abha Number आभा address बरोबर लिंक झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल. आता BACK चं बटन दाबायचं आहे. 

Abha Health Card

abha card download

आभा कार्ड डाऊनलोड कसं करायचं?

आता हे abha card download करण्यासाठी 

dataentryhealth.in वर जाऊन Download Your ABHA Card Download वर क्लिक करा. Download Your Abha Card

Abha Health Card


आभा किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. आभा नंबरजन्म वर्ष आणि तिथं दिलेलं गणित सोडवून Continue वर क्लिक करायचं आहे. 

त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून ही माहिती Validate करायची आहे. कंटिन्यू वर क्लिक. ओटीपी टाकून Continue वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचं आभा कार्ड दिसेल. इथल्या Download या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

Abha Health Card

इथं तुम्ही तुमच्या आभा कार्डवरील ईमेलफोन नंबर आणि इतर माहिती माहिती एडिट करू शकता. तसेच ते delete किवा deactivate करू शकता.

आज आपण abha card, abha id, Abha number तसेच abha id creation, abha health id, abha card download, Abha login, Abha registration, Abha full form विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा.

टिप्पण्या