Health Department Help line No

Help Photo

1) गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) Health toll free no दूरध्वनी क्र. - १८००२३३४४७५
 

(गर्भपात व सोनोग्राफी केंद्रावर अवैद्यरीत्या गर्भलिंग परीक्षण करणे व स्त्री भुण हत्या करणे हा कायद्याने गुन्हा असून त्याची तक्रार आपण या टोल फ्री क्मांकावर करू शकतो.)

2) राजीव गांधी जीवनदाई आरोग्य योजना Toll free दूरध्वनी क्र. - १८००२३३२२०० व १५५३८८
(दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा याकरिता शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया, औषधोपचार, १२१ फेरतपासणी आदी उपचारांचा लाभ घेता येतो. अधिक माहितीकरिता नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा  १८००२३३२२०० किंवा १५५३८८)

3) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम – मोफत संदर्भ सेवा वाहतूक, Toll free दूरध्वनी क्र.१०२ (मुंबई वगळता सर्व ठिकाणी कार्यान्वित) 
(मोफत संदर्भ वाहतुक सेवा राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरीय कॉल सेंटर कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ३० जिल्ह्यांना १०२ हा टोल फ्री क्रमांक (नाशिक व सांगली वगळता, गडचिरोली टोल फ्री क्र.१०५६) देण्यात आलेला आहे. कॉल सेंटरच्या कॉल ऑपरेटर मार्फत वाहतूक सुविधेचे संनियंञण केले जाते. माता व बालके उपलब्ध सेवांच्या प्रकारानुसार जवळच्या आरोग्य संस्थेत संदर्भीत केली जातात तसेच परत त्यांना घरी सोडण्यात येते व आवश्यकता भासल्यास एका आरोग्य संस्थेतून दुस-या आरोग्य संस्थेपर्यंत मोफत वाहतूक सुविधा पुरविली जाते.)


आरोग्य दिनाच्या माहितीसाठी OPEN करा


4) आरोग्य सल्ला संपर्क केंद्र दूरध्वनी क्र. -१०४ 
(आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी  104 क्रमांकावर फोन करून आरोग्यसेवेबाबत मार्गदर्शन घेता येईल.)

5) एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प Toll free दूरध्वनी क्र.१०७५ 
(देशभरात कोठेही उदभवलेली आरोग्‍य विषयक असामान्‍य परिस्थिती कळविण्‍यासाठी १०७५ हा राष्‍ट्रीय पातळीवरील एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्‍पाचा टोल फ्री क्रमांक आहे.)

6) ब्लड ऑन कॉल Helf line no दूरध्वनी क्र. – १०४
 (१०४ नंबर डायल केल्यावर रुग्णवाहिकेप्रमाणे आता रक्ताचीही व्यवस्था केली जाईल. ही सुविधा सुरू झाल्याने रक्ताअभावी रुग्णाचा मृत्यू होणार नाही. अपघाताच्या वेळी अनेक वेळा वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. हे पाहून रुग्णाचे प्राण वाचावेत, यासाठी शासनाने 104 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.)

7) अकस्मात वैद्यकीय सेवा helf line no दूरध्वनी क्र. – १०८ 
(अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी १०८ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते.)

8) राष्ट्रीय कॉल सेंटर Health विषयक माहिती - ९१-११२३९७८०४६ 
(आरोग्य विषयक अधिक माहिती साठी वरील Toll free No चा उपयोग करू शकता.)

9) E- Sanjivani आरोग्य विषयक तज्ञ यांचा सल्ला - १०७५ व ९१ ११ २३९७८०४६ 
(दूरध्वनीव्दारे रूग्णांना या उपक्रमामध्ये सहभागी होवून आपल्या आरोग्यविषयक समस्येवर मार्गदर्शन घेता येते.)

10) मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी सल्ला - १८०० ५०० ००१९ (लवकर तपासणी, प्रथमोपचार, मानसिक सहायता, ताणाचे व्यवस्थापन, मानसिक तंदुरुस्ती, सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणे, मानसिक समस्येचे व्यवस्थापन इत्यादि उद्देशाने मानसिक आरोग्य पुनर्वसन सेवा दिली जाते.)

11) कोविड - १९ विषयक मार्गदर्शन - १०७५, १०४ 
(कोविड कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे होम आयसोलेटेड कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या देखरेखीसाठी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे व्यवस्थापन, अशा कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, कोविड कमांड आणि कंट्रोल सेंटरमध्ये तैनात असलेल्या डॉक्टरांनी दिवसातून दोनदा व्हिडिओ कॉल करेल)

12) व्यसन मुक्ती विषयक मार्गदर्शन - १८०० ११ २३५६
(आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने  एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की तंबाखूच्या पाकिटांवर आता 85 टक्के चेतावणी असतील, ज्यात तंबाखूच्या वापराचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि सोडणाऱ्यांसाठी तंबाखू सोडा क्रमांक 1800-11- 2356 लिहिणे बंधन कारक राहील.)

13) क्षयरोग (TB)विषयक मार्गदर्शन - १८०० ११ ६६६६ 
 (केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने टीबी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना उपचार आणि सल्ला घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. 2025 पर्यंत देशाला टीबी मुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. समाजातील सर्व घटकांनी या विषयावर एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच टीबीमुक्त भारताचे स्वप्न साकार होईल. क्षयरोगाची माहिती मिळण्यासाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. 1800-11-6666 जारी केला आहे.)

14) कुष्ठरोग (Leprosy) विषयक मार्गदर्शन - ०२२ २४११४०००
( कुष्ठरोगविषय जनजागृती तसेच अधिक माहितीसाठी वरील टोल फ्री क्रमांकाचा वापर करू शकता.)

15) महिला व बालविकास विषयक सेवा - ८०८०८०९०६३ 
( महिला व बालविकास प्रकल्पा अंतर्गत अधिक माहिती साठी वरील टोल फ्री क्रमांकावर आपण फोन करून माहिती घेऊ शकता.)

16) आपत्ती व्यवस्थापना संबंधी मार्गदर्शन - १०७७ 
(पुराचा धोका असणारी गावे निश्चित करणे, हवामान खात्याशी संपर्क साधून व स्थानिक पोलीस पाटबंधारे विभागाच्या सहाय्याने पूर व अतिवृष्टीची माहिती त्वरीत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे, आपत्तीसंबंधी माहितीचे संकलन व वितरण योग्य प्रकारे होण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक 0257-2217193/2223180 असा आहे. या शिवाय 1077 हा टोल फ्री क्रमांक सुद्धा आहे.)

17) राष्ट्रीय रस्ता अपघात सेवांसाठी Helf Line no क्रमांक - १०३३ (महामार्गावर तुम्हाला काही समस्या आली तर हा क्रमांक डायल करून तुम्ही मदत मिळवू शकता. संकटाच्या काळात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) जारी केलेल्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुम्ही मदत मिळवू शकता. १०३३ हा टोल फ्री क्रमांक ३६५ दिवस २४ तास सेवेत असतो. या क्रमांकावर कॉल केल्यावर तुम्ही दिलेल्या माहितीनुसार कॉलसेंटरवरील एक्झिक्युटिव्ह तुमच्यासाठी मदत पाठवू शकतो. अपघात झाल्यावर रुग्णवाहिका हवी असल्यास किंवा वाहनामध्ये बिघाड झाल्यास या क्रमांकावर संपर्क केल्यास मदत मिळू शकते. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही.) 

Maharashtra Public Health Department Helf line No, Toll free no विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा.


टिप्पण्या