Heat Stroke in Marathi

 Heat Stroke मुळे  मृत्यू  होण्याची कारणे :-

सगळेच आपण उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात.

घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आहे.

पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळल्या जातो.

- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंडे उकडतं तसे)

- स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.

रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबविला जातो.

Heat Stroke मुळे माणूस कोमात जाण्याचे प्रमाण जास्त आहे किंव्हा कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व  आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..

Heat Stroke- ऊष्माघात टाळा

उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे  उष्माघात टाळण्या साठी खालील उपाययोजना करा..

घराबाहेरील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

- काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या.

शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

- डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा.

- आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.

- कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.

दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.

- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.


Heat Stroke Treatment -

१) त्रास झालेल्या मुलाला/ मुलीला लगेच घरात/ सावलीत आणावे.

२) हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा.

३) संवेदनशील राहून त्यांचे कपडे सैल / ढिले करावे.

४) पायांखाली उशी किंवा तत्सम काही ठेऊन त्यांना आडवे पडायला सांगावे. 

५) नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात.

६) मुल जागे असल्यास वारंवार साफ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत.

७) उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वाळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत.

८) मुल बेशुद्ध असल्यास त्यांना खायला / प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये. 


उष्माघाताचा त्रास झाल्यास करावयाचे प्रथमोपचार

Symptoms of Heat Stroke - 

अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heat Stroke विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा. 

टिप्पण्या