आपणा या लेखामध्ये 12 Important Diseases विषयक माहिती बघणार आहोत, या Diseases चे नाव आपल्याला नेहमीच ऐकण्यात आलेले असते. या मध्ये आपणा Tuberculosis, Leprosy, Polyomyelitis (POLIO), Cancer, Malaria, Cholera, Scabies, Diabetes, Swine Flu, Acquired Immuno Deficiency Syndrome (AIDS), (Severe Acute Respiratory Syndrome (SARS), Dengue विषयक थोडक्यात माहिती बघणार आहोत. important diseases for competitive exams साठी सुधा याचा उपयोग होऊ शकतो.
१) क्षय रोग (Tuberculosis- T.B.)
हा जीवाणू जन्य रोग आहे, क्षयाच्या जिवाणूंचे नाव मायकोबक्तेरियम ट्यूबरक्यूलसिस आहे, हा रोग हवे द्वारे पसरणारा आहे, याचे लक्षणे वजनात घट, थंडी ताप येतो. ३ आठवड्याहून दीर्घकाळ खोकला व त्याहून रक्त पडणे. अर्भके व लहान मुलांना BCG लस टोचून प्रतिबंधात्मक उपचार केल्या जातो.
२) कुष्ठरोग (Leprosy) -
वरील आजार हा जीवाणू जन्य रोग असून तो मायकोबॅक्टेरीयम लेप्री द्वारे होतो. या दंड गोलाकार जीवाणूंचा शोध डॉ ए हस्नन ( नार्वे - १७७३) यांनी लावला. याचे दोन प्रकार आहेत
१) लेप्रोम्यटस - हा सांसर्गिक कुष्ठरोग आहे.
२) नान लेप्रोम्यटस- हा असांसर्गिक कुष्ठरोग आहे.
३) पोलिओ (Polyomyelitis) -
हा विषाणू जन्य रोग आहे. पोलिओ चा विषाणू हा केवळ मानव मध्येच आढळतो. बालके व लहान मुलामध्ये सर्वाधिक परिणामकारक आहे. हे विषाणू तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. आतड्यान मधे बहुसंख्येने वाढतात. व चेतसंथेवर परिणाम करतात. पोलिओ मूळे अवयव (विशेषतः पाय) कायमचे विकलांग होतात. पोलिओ वर कोणतेही उपचार नाही. लसीकरण दयारे त्याचावर प्रतिबंध करता येतो.
४) कर्करोग (Cancer) -
पेशीच्या असामान्य व अनियत्रित वाढीस कर्करोग म्हणतात,
दुर्दम अर्बुद (मलिग्रँट ट्युमर) - कर्करोगाच्या गाठी किंवा पेशी समूह.
कर्कप्रक्षेप (मेटास्ट्रासिस) - प्रगतावस्थेतील रोगाची दुय्यम वाढ किंवा इतर भागात प्रसार.
कर्क रोग फुफुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय आदी अवयव तसेच रक्त किंव्हा अन्य कोणत्याही उतीत होऊ शकतो.
तंबाखू मूळे मुखाचा, प्रतिर्घ धूम्रपाने घसा, आणि फुफुसाचा कर्क रोग होऊ शकतो.
डांबर साधिते, रंजके (dyes) इत्यादीमुळे कर्क रोग होऊ शकतो.
अनुस्फोटक अल्ट्रावायलेट किरणे व क्ष-किरणे त्यामुळे होणाऱ्या किरणीयनाने कर्करोग होऊ शकतो.
मलेरिया आदिजीव - प्लाझमोडीएम वायवॅक्स आहे.
अन्याफिलिप्स डासाची मादी चावल्याने प्लाझमोडीएमचा मानवी शरीरात प्रवेश होऊन हिवताप पसरतो.
प्लाझमोडीएम वायवॅक्स या आदीजीवास आपले जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी माणूस व डास अशा पोशिदाची गरज असते.
याची लक्षणे म्हणजे प्लाझमोडीएमचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर हिवताप होतो. प्रथम थंडी वास्ते व नंतर खूप ताप येतो. थंडी ताप सतत चालू राहिल्यास प्लीहा मोठी होऊन पंडुरोग होतो.
मेंदूचा हिवताप या प्रकारात रोगी बेशुद्ध होतो व मृत्यू देखील संभावतो.
यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे पाणथळ जागेतील डासांची अंडी नष्ट करण्यासाठी डीडीटी बीसीएच खनिज तेल इत्यादी पाण्यावर फवारावे.
रोगाचे वर्गीकरण व जीवनसत्वे ची माहितीसाठी OPEN करा
५) हिवताप (Malaria)- संसर्गजन्य रोग
६) पटकी (Cholera) - संसर्गजन्य रोग
व्हीब्रिओ कॉलर या स्वल्पविराम आकाराच्या जिवाणूपासून फटकी पटकी रोग होतो. याची लक्षणे उलट्या आणि तीव्र जुलाब होऊन शरीराचे निर्जलीकरण होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे घरमाशांचे नियंत्रण होय.
७) खरुज (Scabies) : संसर्गजन्य रोग
खरुजेचा किडा सारकॉप्टीस स्केबी (संदीपाद वर्गातील प्राणी) मुळे होतो.
८) मधुमेह (Diabetes) -
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित न झाल्यास मधुमेह ( साखरीन) हा रोग होतो. मधुमेह अनुवंशिक रोग आहे.
९) स्वाईन फ्लू (Swine Flu) -
2009-10 मध्ये जगातील सुमारे 200 होऊन अधिक देशात धुमाकूळ घातलेला रोग आहे. एप्रिल 2009 मध्ये मेक्सिको मध्ये या रोगामुळे 150 होऊन अधिक व्यक्तीचा मृत्यू झाला. याचा कारक विषाणू इन्फ्लुएंजा ए ,(एच -१ एन- १) आहे. गेल्या अनेक वर्षातील फ्ल्यूची ही सर्वाधिक भीषण साथ होती. स्वाईन फ्लूचा विषाणू डुकराच्या शरीरात सर्वाधिक आढळतो. मात्र डुकराचे मास खाल्ल्याने स्वाईन फ्लू होत नाही. भारतात स्वाईन फ्लूचा पहिला बडी रीदा शेख (पुणे) यांचा झाला होता. भारतात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी महाराष्ट्रातील पुणे शहरातील होते.
१०) एड्स (Acquired Immuno Deficiency Syndrome (AIDS))-
हा विषाणूमुळे होणारा रोग आफ्रिकेतील बबून माकडापासून प्रसारित झाला, असे काही संशोधकाचे मत आहे, भारतात एड्सचा पहिला रोगी 1984-85 मध्ये आढळला. याची लक्षणे म्हणजे वजनात लक्षणीय घट होते, अचानक ताप व घाम येतो. याचा प्रसार नियमबाह्य रक्तदान करणारे, धंदेवाईक रक्तदाते, समलिंगी आकर्षण असणाऱ्यांमध्ये वेश्यागमना सारख्या अनैतिक प्रवृत्तीतून एड्सचा प्रसार एचआयव्ही या विषाणू द्वारे होतो. महत्वाचे म्हणजे डास चावल्याने एड्स होत नाही.
निदान चाचण्या: Elisa, Western Blot Test.
१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
उष्माघात विषयक माहितीसाठी OPEN करा
११) सार्स (Severe Acute Respiratory Syndrome (SARS)-
एप्रिल 2003 या काळात या रोगाने भारतात तसेच जगभर थैमान घातले. होंगकोंग या शहरात सार्थचा उद्रेक सर्वाधिक झाला. कोरोना या विषाणूपासून सार्स होतो असे संशोधकांचे मत आहे. याची लक्षणे कोरोना व्हायरसमुळे 38 सेल्सिअस पेक्षा अधिक ताप येतो. तीव्र डोकेदुखी व अंगदुखी. कोरडा खोकला व श्वसनास बाधा येते. जगभरातील सुमारे 46 देशात सातचा प्रसार झाला होता. सारस हा संसर्गजन्य रोग आहे. कोरोना व्हीरेडी या विषयांमध्ये RNA आम्ल असते.
१२) डेंग्यू (Dengue)-
ऑक्टोंबर 2003 मध्ये मुंबईत डेंगू तापाने थैमान मांडले होते, याचा प्रसार एडीस इजिप्सी या गटातील टायगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या डासामुळे डेंगूचा झपाट्याने प्रसार होतो. डेन -१, - २ , -३, - ४ या विषाणूमुळे हा रोग पसरतो. मुंबईतील डेंगूची साथ डेन-३ या विषाणूमुळे पसरली होती. बेशिस्त शहरीकरण हे डेंगूचे मुख्य कारण आहे.
Diseases विषयक माहिती आपलाला आवडली असेल तर Like & Share करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा