Marathi.India Typing

 

Phone What's app logo

आज आपण तोंडाने बोलून Marathi-Typing कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Marathi-Typing कीपॅड असणे आवश्यक आहे. आपण यामध्ये Marathi आणि English या दोन्ही माध्यमातून Typing करू शकतो. Tapy केलेला डाटा आपण मेल द्वारे किंवा WhatsApp पीसीला अटॅच करून आपण तो डाटा word Document मध्ये पेस्ट करून आपण त्याची Print out घेऊ शकतो. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मोबाईल मध्ये बोलण्याद्वारे typing करत असतो तेव्हा आजूबाजूला शांतता असणे आवश्यक आहे. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला उच्चार हा स्पष्ट असायला हवा, कारण आपण जे बोलतो तोच माइक मधून output द्वारे लिखित स्वरूपात आपल्याला दिला जातो. माइक द्वारे typing करीत असताना आपल्याला एक-एक शब्द त्या माइक मध्ये बोलायाचे आहे. माझ्या प्रत्यक्षात केलेल्या अनुभवानुसार आपण जे हाताने typing करतो त्याही पेक्षा fast typing आपण आपल्या बोलण्यातून करू शकतो. 

ज्यांना Marathi-Typing येत नाही, त्यांच्यासाठी हे खूपच उपयुक्त आहे. आपण जे type करीत असतो तेव्हा एक वाक्य झाले की चेक करत जावे, आपण जे type करीत आहोत ते बरोबर आहे किंवा नाही. चुकीचे शब्द आले असेल तर आपण typepright द्वारे ते दुरुस्त करू शकतो आणि पुन्हा समोर जाऊ शकतो. आपण जे पण type करणार आहोत ते WhatsApp च्या कुणाच्या तरी inbox मध्ये type करायचं आणि नंतर तेथून copy करून आपण mail किंवा WhatsApp computer ला अटॅच करून आपण ते word document मध्ये paste करू शकतो. किंवा आपण mobile मधील email ओपन करून कंपोज मेलच्या बॉक्समध्ये आपण type करू शकतो. Type केलेला Data हा ड्रॉप मध्ये सेव झालेला असतो नंतर आपण तेथून copy करून word document मध्ये paste करू शकतो हा सर्वात सोपा मार्ग आहे. आपण जे बोलण्यातून type करणार आहोत तो कीपॅड वरती जो माईक आहे त्यावरून करणार आहोत.

यामध्ये आपण पुन्हा एक गोष्ट शिकणार आहोत ती म्हणजे मोबाईल मध्ये मराठी कीपॅड कसं आणायचं. 

Mobile मध्ये marathi Font- सर्वप्रथम तुमच्या mobile च्या कीपॅड ला settings ऑप्शन कुठे आहे ते शोधा. 

Mobile keyboard Setting
  Setting option मध्ये गेल्यावर languages हा ऑप्शन दिसेल त्याला प्रेस करावे.
Mobile keyboard language add
  
त्यानंतर add keyboard हे ऑप्शन सिलेक्ट करावे. 

त्यानंतर Marathi (India) हे ऑप्शन सिलेक्ट करावे. 


त्यानंतर त्यामध्ये पहिलाच abc- marathi हे ऑप्शन येईल त्याला सिलेक्ट करावे. त्यानंतर हे Done हे ऑप्शन सिलेक्ट करावे. 

आता तुमच्या मोबाईलच्या कीपॅडला मराठी आणि इंग्लिश ऑप्शन चेंज करन्यासाठी एक गोलाकार सिम्बॉल असेल तेथून आपण इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज सिलेक्ट करून आपण माईकद्वारे इंग्लिश असेल तर इंग्लिश आणि मराठी मध्ये असेल तर मराठी मध्ये टायपिंग करू शकतो. 
आपण कीपॅड मध्ये मराठी लँग्वेज केल्या नंतर कीपॅड मध्ये कोणतेही चेंज दिसणार नाही फक्त आपण कोणती लँग्वेज सुरू आहे ते चेक करायचं असेल तर स्पेस बटणमध्ये English लिहलेले असेल आणि ?123 हे आकडेवारी हे इंग्लिश मध्ये दिसेल. आणि मराठी कीपॅड चालू असेल तर स्पेस बटन मध्ये MR.EN असे लिहून दिसेल आणि ?१२३ हे मराठी मध्ये आकडेवारी दिसेल. 
आपल्याला समजा मराठी मध्ये टाईप करायचं आहे, तर सर्वप्रथम आपण आता मराठी लँग्वेज सिलेक्ट करू. आपला जो मोबाईलचा कीपॅड आहे त्याच्या वरती एक छोटसं माईकचं सिम्बॉल आहे त्याला प्रेस करायचं आहे. प्रेस केल्या नंतर आता बोला हे स्क्रीनवर येईल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एक एक शब्द बोलून मेसेज टाईप करायचं आहे. आणि एक वाक्य झाले की बघायचं आहे की आपण बोललेले शब्द बरोबर टाईप झाले किंवा नाही तसेच काम फुल स्टॉप वगैरे द्यायचे आहे.
चला तर मग आता मराठी टायपिंग साठी कुणाच्या मागे लागण्याची गरज नाही. एका दिवसात मराठी टायपिंग शिकू शकता.


टिप्पण्या