आपला दवाखाना (My Clinic) सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Hospital) योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाकडून १५ वा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विषयक योजनांसाठी तसेच ग्रामीण आणि नागरी भागातील विविध प्राथमिक आरोग्य संस्थाना सक्षम करण्यासाठी सन २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षाच्या कालावधीत उपक्रम राबविले जाणार आहेत. शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्या व झोपडपट्टी सद्द्श भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहेत. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रद्यानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरिता ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Hospital) ची स्थापना करण्यात येणार आहे.
सन २०१९-२० मधील प्रायोगिक तत्वावर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शिवाजी नगर आणि खारेगाव येथे आपला दवाखाना (Hospital) केंद्राची स्थापना करण्यात आली. आपला दवाखाना प्रकल्पास अनुसरून त्याच धर्तीवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Hospital) पहिल्या टप्पात राज्यातील एकूण ३४२ तालुक्यात १ मे २०२३ ला कार्यान्वित होणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रत्येक तालुक्यात १ या प्रमाणे ३५५ आपला दवाखाना केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. १५ व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रापैकी प्रत्येक तालुक्यातील एक शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे रुपांतर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रात करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन १ मे ‘महाराष्ट्र दिन या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते डिजिटलरित्या होणार आहे.
१ मे ‘महाराष्ट्र दिना’ पासून
या दवाखान्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात
असून, औषधीसाठा, मनुष्यबळ, आदींबाबतचे
नियोजन सुरू आहे. या दवाखान्यामुळे आरोग्य व्यवस्थेला एक प्रकारचा बूस्टर मिळणार
आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या
रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, आदी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक
केंद्रांद्वारे स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे
उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
‘आपला दवाखाना’ (Hospital) आरोग्य योजनेचा विस्तार करणार आहे. महाराष्ट्र सरकारने मोफत आरोग्य सेवा योजना 'आपला दवाखाना' (My Clinic) राज्याच्या इतर भागांमध्येही विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे असे दवाखाने उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब साहेब ठाकरे यांच्या नावावर असलेल्या या योजनेच्या विस्तारामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरातील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. सुरुवातीला मुंबईत सुरू झालेला 500 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (My Clinic) राज्याच्या विविध भागात सुरू करण्यात येणार आहेत. 'आपला दवाखाना' हा मुंबईसाठी घेतलेला पहिला उपक्रम होता. "मुंबईत या उपक्रमाची सुरुवात झाली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला कारण लोकांचे क्लिनिक त्यांच्या घराच्या अगदी जवळच असल्याने लवकर उपचार मिळतात. त्यामुळे अशा प्रकारचे दवाखाने सर्व तालुक्यांमध्ये सुरू होतील.
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (My Clinic) ची वैशिष्ट्ये:-
१) MBBS डॉक्टरांसह परिचारिका, स्वच्छता कर्मचारी सेवेत राहणार आहेत.
२) आपला दवाखान्यातील OPD ते साधारणत दुपारच्या सत्रात सुरू राहील, अशी माहिती आहे.
३) हे दवाखाने सध्या भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी जागा व परिसरही जवळपास निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
४) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे डॉक्टर, परिचारिका, स्टाफ नर्स, अटेंडंट, आदींची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
५)
१ मे २०२३ पासून प्रथम टप्यात ३४२ तालुक्यात दवाखाने सुरु होणार आहेत.
आपला दवाखाना (My Clinic) योजनेंतर्गत सुविधा:-
१) बाह्य
रुग्ण सेवा (OPD) वेळ दुपारी २.०० ते रात्री १०.००)
२) मोफत
औषधोपचार
३) मोफत
प्रयोगशाळा तपासणी
४) टेलीकन्सल्टेशन
५)
गर्भवती मातांची तपासणी
६) लसीकरण
तसेच My Clinic मध्ये या व्यतिरिक्त -
१)
महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी
२) बाह्य
यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय
३)
मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा
४) आवशक्तेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा
My Clinic (Hospital) या विषयक माहिती आवडली असेल तर Like & Share करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा